NEWS & EVENTS:-
डिजीके मध्ये मराठी भाषिक पंधरवडा साजरा
भारत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा पंधरवडा 'मराठी भाषिक संवर्धन' म्हणून मराठी विभागाकडून साजरा करण्यात आला. यामध्ये प्राध्यापक, प्राध्यापकेतर यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.उपक्रमाचा क्रमलेख असा राहिला- 1) दि. 3 जानेवारी:-'ज्ञानेश्वरांची समृद्ध लेखणी' या विषयावर प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून लेखन उपक्रम करून घेण्यात आला. 2) दि. 6 जानेवारी:-'मराठीच्या विविध बोली' याचे हस्तलिखित तयार करण्यात आले.(प्रथम वर्ष कला) 3) दि. 7 जानेवारी:-तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन. प्रथम क्र. ओंकार विष्णू पवार F.Y.B.Sc. द्वितीय क्र. गौरी बाळू ऐवळे T.Y.B.A. तृतीय क्र. ऋषिकेश देवेंद्र देवकर S.Y.B.A. 4) दि. 9 जानेवारी:- महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धा. प्रथम क्र. ओंकार विष्णू पवार F.Y.B.Sc. द्वितीय क्र. कौस्तुभ हेमंत फाटक T.Y.B.A. तृतीय क्र. सुयोग मारुती शितप S.Y.B.Com. उत्तेजनार्थ क्र. सुयोग प्रकाश बेंडल S.Y.B.A. 5) दि. 10 जानेवारी:- वि. दा॰ सावरकर यांनी पर शब्दांना सुचविलेले मराठमोळे प्रतिशब्द यावरील लेखन उपक्रम(प्रथम व द्वितीय वर्ष कलाचे सर्व विद्यार्थी) 6) दि. 11 जानेवारी:- कला शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बोलपटाचे रसग्रहण व डॉ. श्रीराम लागू या नटसम्राटाला श्रद्धांजली म्हणून 'सिंहासन' हा चित्रपट दाखवण्यात आला. 7) दि. 13 जानेवारी:- 'सूत्रसंचालन व निवेदन कार्यशाळा' या उपक्रमाचे आयोजन इच्छुक तसेच कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. मार्गदर्शक व्याख्याती म्हणून सौ. दिप्ती कानविंदे यांनी ही कार्यशाळा घेतली. 8) दि. 14 जानेवारी:- या दिवशी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्यासाठी छोटेखानी उपक्रम झाले. 1) गाण्याची अंताक्षरी 2) श्ब्द्प्रधान गीतगायन 3) व्याकरणाधारित शब्द अंताक्षरी 4) एकाच शब्दाचा विविधांगी वाक्यरचनेत वापर 5) निर्णयक्षमता/भाषा या विषयांवर 3 मिनिटांचे उस्फूर्त भाषण. काही ठिकाणी दोन गट(प्राध्यापक व प्राध्यापिका) करण्यात आले होते. या स्पर्धा उपक्रमात प्राध्यापक गट विजयी झाला. शिवाय उस्फूर्त भाषण स्पर्धेत अनुक्रमे प्रा. वैभव कीर, प्रा. आसावरी मयेकर, लॅब असिस्टंट रूपम कांबळे विजेते ठरले. तसेच विविधांगी वाक्यरचनेत सर्वात्कृष्ट रचना NSS प्रमुख प्रा. मधुरा पाटील यांनी केली . 9) 15 जानेवारी:-'अभिवाचन मार्गदर्शन 'कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याचे मार्गदर्शन श्री. अनिल दांडेकर यांनी केले . कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त वाड्मय मंडळाचे उद्घाटन हे उद्घाटन प्रमुख अतिथी श्री.अनिल दांडेकर व डॉ.चंद्रशेखर केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या पंधरवडयातील सर्व उपक्रमांकरिता संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य श्री. उदय बोडस यांचे सहकार्य लाभले .
Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri