NEWS & EVENTS:-
वक्तृत्व स्पर्धेत दुसऱ्यांदा डिजीकेची बाजी
नवनिर्माण शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रत्नागिरी येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून राज्यस्तरीय चषक आपल्याकडेच राखला आहे. महाविद्यालयाच्या संकुलात 16 ऑगस्टला स्पर्धा झाली. स्पर्धेत अंतिम निकालात सिद्धी नार्वेकरला व्यक्तिगत पहिला, कौस्तुभ फाटकला तिसरा क्रमांक मिळाला. सर्वाधिक सांघिक गुणांच्या आधारावर देव-घैसास-कीर महाविद्यालयाला विजेतेपदाचा चषक मिळाला. स्पर्धकांना प्रभारी प्राचार्य उदय बोडस,सांस्कृतिक विभागप्रमुख दीपाली भाबल यांनी मार्गदर्शन केले.

Photos

Click on photos to enlarge Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri