NEWS & EVENTS:-
लोकसत्ता वकृत्व स्पर्धेत कौस्तुभ फाटक द्वितीय
भारत शिक्षण मंडळ "देव-घैसास-कीर" कला-वाणिज्य-विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कौस्तुभ फाटक (एस वाय बी ए) हा लोकसत्ता दशसहत्रेशु या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये त्याने प्राथमिक फेरी करिता 'चरित्रपटांचे चारित्र्य' यावर वकृत्व केले. यासाठी त्याचे रत्नागिरी विभागाच्या अंतिम सहामध्ये निवड झाली. दि. 10 मार्च 2019 रोजी रत्नागिरी विभागीय अंतिम फेरीमध्ये 'गल्लीबॉयेचे भवितव्य' या विषयावर वकृत्वकरून द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या निलोफर बन्निकोप, संस्थेचे पदाधिकारी, संस्कृतिक विभाग प्रमुख व मार्गदर्शक सहा.प्राध्या दीपाली भाब, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
Go BackWebsite developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri